आपला वाडा

" आपला वाडा " मध्ये आपले स्वागत.
हा ग्रुप वाडा शहर व परिसरात राहणाऱ्या तसेच नोकरी, धंदा, शिक्षणा निमित्त वाड्याच्या बाहेर गेलेल्या परंतु वाडा शहरा बद्दल आत्मीयता असलेल्या फेसबुक मेम्बर्स करिता बनवला आहे.
ह्या ग्रुप द्वारे आपण वाडा शहर व तालुक्यातील सामाजिक घटनांची व समस्यांची चर्चा करू शकतो. वाडा परिसरात झालेल्या अथवा होणाऱ्या सामाजिक कार्यक्रमांची माहिती इथे पोस्ट करावी.
ह्या ग्रुप मध्ये कृपया कोणीही वैयक्तिक माहिती अथवा वैयक्तिक टिप्पणी पोस्ट करू नये.

जे वाडा तालुक्याचे रहिवासी आहेत किंवा होते, तसेच ज्यांचा नोकरी - धंदा - शिक्षण या निमित्ताने वाडा तालुक्याशी संपर्क आहे अथवा राहिला आहे; अशा आपल्या मित्रांना आपला वाडा ग्रुप मध्ये सामाविष्ठ करून वाडा तालुक्यातील सोशल नेट्वर्किंग ला बळकटी देण्यासाठी हातभार लावावा.

सोशल नेटवर्किंगची साधने हा 'टाइमपास'चा विषय आहे, असे म्हटले जात असेल तर ते चुकीचे आहे. फेसबुकवर अशा कितीतरी चळवळी चालू असलेल्या आपल्याला दिसतील. लोकांना एकत्रित करण्याची फार मोठी शक्ती त्यात आहे. सर्वच स्तरांतील लोकांसाठी संवाद साधण्याचे ते एक महत्त्वाचे साधन आहे. युवा वर्गाला आपल्या आशा आकांक्षा व्यक्त करण्याचा एक सक्षम मंच आहे. भ्रष्टाचार, कुशासन, अत्याचार यांच्या विरोधात अभियान चालवण्यासाठी एक उपयुक्त अशी युद्धभूमी आहे. आपल्याला रोजच्या जीवनात सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या समस्या जाहीर पणे मांडून त्यावर उपाय शोधण्याचा हा एक मार्ग बनू शकतो. या साठी जास्तीत जास्त मंडळींनी एकत्र येणे गरजेचे आहे.

आपला वाडा ची ग्रुप मीटिंग १५ ऑगस्ट २०११ रोजी संध्याकाळी ५:३० ते ७:३० या वेळेत संपन्न झाली. या मीटिंग मध्ये ग्रुप च्या या पुढील वाटचाली बद्दल विस्तृत चर्चा झाली व सर्वानुमते एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार १५ ऑगस्ट २०११ पासून आपला वाडा ग्रुप ची एक "निर्णय समिती" Decisive Committee (DC) कार्यान्वित केली आहे व या निर्णय समितीच्या सल्ल्याने व सहमतीनेच आपला वाडा ग्रुप च्या बाबतीतले सर्व महत्वाचे निर्णय घेतले जातील. आपला वाडा ग्रुप च्या यशस्वी वाटचालीसाठी सकारात्मक रित्या सहभागी होणाऱ्या सदस्यांना या समिती मध्ये सामावून घेतले जाईल.

सध्याची निर्णय समिती Decisive Committee (DC) : As on 9/4/2014
१) विशाल मुकणे
२) कुणाल राऊत
३) प्रल्हाद रानवडे
४) डॉ. अमित पाटील
५) रोहन पाटील
६) करिष्मा शिर्के
७) वैभव लोहगावकर
८) मिलिंद भानुशाली
९) अमोल पाटील
१०) सदानंद नायक
११) स्नेहा शिंगरी

आपला वाडा ग्रुप मध्ये सामाजिक वातावरण चांगले कसे राहील याची जवाबदारी या समितीकडे असेल.
आपला वाडा ग्रुप द्वारे केल्या जाणाऱ्या ग्रुप बाह्य सामाजिक उपक्रमांचे निर्णय ही समिती घेईल.
आपला वाडा ग्रुप च्या यशस्वी वाटचालीसाठी सकारात्मक रित्या सहभागी होणाऱ्या सदस्यांना या समिती मध्ये सामावून घेतले जाईल.